छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोघां विरोधात मालवण पोलिसात गुन्हा दाखल

 

मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघा विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 109, 110, 125, 318, 3 (5) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा रजि. नं. 133/2024 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.