भाजप युवा नेते संदीप गावडे आयोजित सावंतवाडी दहीहंडी महोत्सवात जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपचे युवा नेते संदीप गावडे आयोजित सावंतवाडी दहीहंडी महोत्सवात उत्तरोत्तर रंगत वाढतच आहे. शहरातील अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने रात्री ९ च्या सुमारास पाच थरांची सलामी देत या महोत्सवात अधिकच रंगत आणली. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या गोविंदा पथकाचे कौतुक केले. सुरुवातीला चार व त्यानंतर पाच थर लावत या गोविंदा पथकाने सावंतवाडीकरांची मने जिंकली. सावंतवाडी शहरातीलच गोविंदांचा सहभाग असलेल्या अमेय तेंडोलकर मित्रमंडळाने लावलेल्या पाच थरांच्या सलामीची क्षणचित्रे प्रेक्षकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली. त्यानंतर संदीप गावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचा यथोचित सन्मान करण्यात आला.












