चिपळूण- परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण या शाळेत दहिहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेत पहिल्या सत्रात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगिता नाईक मॅडम यांच्या हस्ते बाळकृष्णचे पूजन करण्यात आले.
दहिहंडी सणाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक श्री.आशिष मांडवकर यांनी श्रीकृष्ण जन्मकथा सांगून श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या बाललीलांचे आपल्या रंगतदार शैलीत कथन केले.
दुसऱ्या सत्रात दहिहंडी पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला परशुराम एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष मा. श्री. राजीव कानडे,कार्यवाह मा. श्री.संजय मोने,सहकार्यवाह मा.श्री.विजय चक्रदेव , कोषाध्यक्ष
मा.श्री.विजयकुमार ओसवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक व शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री.विजयकुमार ओसवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहिहंडीचे पूजन करण्यात आले व दहिहंडीला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थी श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषा करून आले होते.
सुशोभित केलेली दहिहंडी उंचावर बांधण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ‘गोविंदा रे गोपाला’ ठेक्यावर बालगोविंदांनी ताल धरीत, नृत्य करत, थर लावत दहिहंडी फोडली.
प्रत्येकाच्या मनात एकता आणि संघभावना निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.










