सातुळी बावळाट ग्रामस्थांनी एस. टी. च्या अनियमित सेवेबद्दल आगारप्रमुखांना विचारला जाब

ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी तून सातूळी बावळाट गावात प्रवासी वाहतुकीचे कोणतीही सोय नसताना या भागात केवळ एस. टी. हाच येण्या जाण्याचा पर्याय आहे मात्र या भागात जाणारी एस. टी शाळेच्या सुट्टीच्या दिवशी जात नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अनेकअडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आणि याबाबत सावंतवाडी आगार प्रमुखांना वेळो वेळी कल्पनाही दिली होती मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर संतप्त ग्रामस्थानी सावंतवाडी एसटी आगार गाठून एस टी आगार प्रमुख निलेश गावित यांना चांगलाच जाब विचारला.

 

 

 

यावेळी सातूळी बावळाट या ग्रुप गावच्या सरपंचा सोनाली परब यांच्यासह शिवसेना शिंदेगट जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संतप्त ग्रामस्थानी आगार प्रमुख निलेश गावित यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला . गावात एस टी सेवा कॉलेज सुट्टीच्या दिवशी बंद असते यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होते एस. टी सेवा दानोली बाजार पेठे पर्यंत सूरूच असते मात्र इथून पुन्हा सातूळी बावळाट येथे जाताना पायी प्रवास करावा लागतो. जर एस टी सेवा सातूळी बावळात पर्यंत सुरळीत न केल्यास या दोन्ही गावचे महत्वाचे ठिकाण असणाऱ्या दाणोली बाजारपेठेतून होणारी एसटी ची वाहतूक सेवा दानोली बाजारपेठ येथे रोखली जाईल. एस टी रोको आंदोलन करण्याचा येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.

 

 

सावंतवाडी बस स्थानकातून सकाळी ९:१५ वाजता सुटणारी बावळाट बस ही केवळ शालेय विध्यार्थ्यांनसाठीच नसून ती पूर्वीपासुनची नियमितत फेरी. आहे. त्यातच ही 9.15 वा. सुटणारी एस. टी. अनेकदा तब्बल एक एक तास उशिराने सुटते. त्या मुळे या एस टी च्या भरोशावर एस. टी ची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थाना, विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. मिळेल त्या वाहनाने घर गाठाव लागत.यामुळे अतिरिक्त पैशाचा फटका बसतोच त्या बरोबर वेळेचाही मोठा फटका बसतो . दुपारी १२ वाजताची बस सुरु आहे पण शालेय सुट्टीच्या दिवशी या फेऱ्या बंद ठेवल्या जातात. याकडे आगार प्रमुख निलेश गावित यांचे लक्ष वेधले.

 

 

ग्रामस्थ्यांचे आक्रमक रूप बघता अखेर आगार प्रमुख निलेश गावित यांनी
सकाळी ९:१५ वाजता सुटणारी बस वेळेत सोडण्यासह शालेय सुट्टीच्या दिवशीही या बससह दुपारची बस नियमित सोडण्याची ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थानी अखेर एसटी आगार सोडले.तसेच सायंकाळच्या सत्रात एक बस सुरू करण्याबाबत विचार करू असे आश्वासनही दिले. यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, एकनाथ हळदणकर, उपसरपंच स्वप्निल परब, माजी सरपंच उत्तम परब, माजी उपसरपंच पांडुरंग बुराण, ग्रामपंचायत सदस्य दया परब, सुरेश कदम, अभय मालवणकर, पोलिस पाटील अरुण परब, अँड विठ्ठल परब, भरत परब, देविदास परब, शशिकांत गावडे, शांताराम सावंत, रमाकांत परब, बाबा सावंत, सुरेश परब, उदय नाईक, विनोद मल्हार, आनंद परब, वेदिका मल्हार, वासू कानसे, गणपत सावंत, सुनिल कानसे, नितेश कानसे, ओंकार परब, खेमाराज सावंत, विनायक परब, विष्णू परब, मीना परब, गिरीश गावडे,आदी सातुळी, बावळाट गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.