वेंगुर्ला l प्रतिनिधी– मेजर ध्यानचंद यांनी त्यावेळच्या बिकट परिस्थितीत देखील भारताला तीनवेळा ऑलिपिक गोल्ड मेडल मिळवून दिले. त्यांचा आदर्श आताच्या मुलांनी घ्यावा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी बॅ.खर्डेकर महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, प्रा.वामन गावडे, प्रा.डी.जी.शितोळे, सुरेंद्र चव्हाण, प्रा.जे.वाय.नाईक, के.आर.कांबळे, व्ही.पी.देसाई, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, संभाजी पाटील, माजी. प्राचार्य आनंद बांदेकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.












