अज्ञात वाहनाची दोघी बहिणींना धडक, दोघी जखमी 

 

 

वेरवली राम मंदिर स्टॉप येथील घटना 

लांजा (प्रतिनिधी) रस्त्याने चालणाऱ्या दोघा बहिणींना पाठीमागून धडक देत त्यांना जखमी केल्याची घटना वेरवली राम मंदिर स्टॉप या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी येथील राहणाऱ्या कुमारी समिता सिताराम शिंदे (वय २५) व चुलत बहीण नियती चंद्रकांत शिंदे (वय १९) या दोघीजणी दिनांक २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०६ वाजण्याच्या दरम्याने वेरवली राम मंदिर स्टॉप या ठिकाणी रस्त्यावरून चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाने या दोघींना धडक दिली .या अपघातात या दोघी बहिणी जखमी झाल्या. मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने या ठिकाणी न थांबता किंवा अपघातात जखमी दोघी बहिणींना कोणत्याही प्रकारे मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.

या दोन्ही बहिणींवर रुग्णालयात उपचार करून त्यानंतर त्यांनी या अपघाताची माहिती रविवारी १ सप्टेंबर रोजी लांजा पोलिसांना दिली .त्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(असं), मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/ १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली

सहायक पोलीस फौजदार बी. एस रेवणे हे करत आहेत.