
लांजा (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्या मंदीर व कै. एकनाथ राणे हायस्कूलने १ गोल्ड, १ सिल्व्हर आणि १ ब्राॅंझ अशी तीन पदके पटकावली. तसेच एका विद्यार्थीनीची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर जिल्ह्यास्तरीय स्पर्धा डेरवण येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर विद्या मंदीर व कै. एकनाथ राणे हायस्कूलच्या १४ खेळाडूंची निवड झाली होती. या स्पर्धेत १४ वर्षे मुलींच्या गटात तेजस्वी लाड प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील गटात पायल जोशी तृतीय क्रमांक तर महमंद जैद मुकरी द्वितीय क्रमांक असे यश संपादन केले आहे. तेजस्वी लाड हिची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना लांजा तालुका तायक्वांदो कोच तेजस्विनी आचरेकर, तेजस पावस्कर , शीतल आचरेकर व क्रीडा शिक्षक सुशिल वासुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संचालक कौस्तुभ राणे, मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे, सौ प्रिया भागवत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.












