नवी दिल्ली : Kim Jong-hanged-North Korea उशिरा मिळालेला न्याय म्हणजे न्यायाला नकार देणे होय, असं म्हटलं जातं. सध्या याच विषयावरून आपल्या देशात आंदोलनं आणि चर्चासत्रंही घडत आहेत. पण, एखाद्या गुन्ह्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करून, थेट मृत्यूदंड देण्यात आला आहे.
Kim Jong-hanged-North Korea उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग नेहमीच आपल्या सनकी निर्णयांमुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा देश भीषण पूरस्थितीला तोंड देत असून, आतापर्यंत हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. Kim Jong-hanged-North Korea ही पूरस्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या ३० सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकविण्याचे आदेश राष्ट्रप्रमुख किम जोंग यांनी दिले आहेत.
Kim Jong-hanged-North Korea याआधी, गेल्या महिन्यात किम जोंगने त्याच्या पक्षातील २० ते ३० लोकांच्या हत्येचे आदेश दिले होते. पूरग्रस्त चागांग प्रांतातील पक्षाचा निलंबित सचिव कांग बोंग हून याला देखील अटक करण्यात आली आहे. पुरामुळे उत्तर कोरियाचं मोठं नुकसान झालं असून जवळपास ४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यांच्यामुळं या लोकांचा मृत्यू झाला त्यांना कठोर मृत्युदंड देण्यात आला आहे. या पुरामुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी स्वत: किम जोंगने केली. याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
Kim Jong-hanged-North Korea देशातील पुरामुळे झालेलं नुकसान आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या किम जोंगने हा निर्णय घेत, देशातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या काळजीत वाढ केली आहे. या निर्णयामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, आणखी काही अधिकाऱ्यांवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किम जोंगनं स्वत: पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर खरे आकडे समोर आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान, पुरामुळं नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपल्याला बदनाम करणाऱ्यासाठी दिल्याचं किम जोंगने म्हटलं आहे.
Kim Jong-hanged-North Korea पुरामुळं चागांग प्रांतातील अनेक भागांचं नुकसान झालं असून, काही राज्यांमध्ये आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस आणि जमीन खचण्याच्या घटनांमध्ये ४ हजारांवर लोक मारले गेले आहेत. दरम्यान, १५ हजार ४०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. किम जोंगनं पूरस्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ लागेल, असं म्हटलं आहे.












