संतोष कोत्रे | लांजा-: शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं.५ या शाळेची मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-२ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.
टप्पा २ या स्पर्धात्मक अभियानाचे नुकतेच मुल्यांकन झाले होते.या अभियानात लांजा तालुक्यात प्राथमिक शाळा गटात लांजा नं. ५ ही शाळा प्रथम आली होती. पुन्हा जिल्हास्तरीय समितीने जिल्हात शाळांचे मूल्यांकन करून त्यात लांजा नं. ५ या शाळेने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा अभियानला मोठा प्रतिसाद प्रार्थमिक आणि माध्यमिक शाळा यांनी प्रतिसाद दिला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अभियानाची नोंद झाली आहे.
या अभियानात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांना भरीव रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत लांजा तालुक्यात सर्व शाळांनी या अभियानात सहभागी घेतला आहे.१५० गुण या अभियानात आहेत
लांजा नं. ५ ही शाळा स्मार्ट शाळा म्हणुन नावारूपाला आली आहे .या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. दरम्यान, मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-२ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांकासाठी निवड झाल्याबद्दल लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी विनोद सांवग, केंद्र प्रमूख चंद्रकांत पावसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप चौगुले,
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.










