हिंदूंचे देव, दैवत, संत यांच्या अपमान केल्याबद्दल करण्यात आला निषेध
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका महायुतीकडून आज गुरुवारी लांजा तहसील कार्यालयासमोर खासदार शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
संभाजी ब्रिगेडच्या जाहीर कार्यक्रमात
खासदार शरद पवार यांच्या समोर हिंदू देवतांबद्दल आणि संतांबद्दल जाहीर अपमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. या प्रकरणी आज महायुतीकडून लांजा येथे खासदार शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निषेध निषेध असो निषेध असो शरद पवार यांचा निषेध असो, नाठाळाच्या माती हाणू काठी, महायुतीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
लांजा तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निषेधाच्या प्रसंगी भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली ,त्याचप्रमाणे तालुका सरचिटणीस विराज हरमले, शैलेश खामकर, ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरूप, नगरसेवक संजय यादव तसेच भरत कोळवणकर, अनिल कांबळे ,शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत , नगरसेवक सचिन डोंगरकर प्रसाद भाईशेट्ये ,अशोक गुरव, राजू धावणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.








