अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा
खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील धामणी येथील एका घरातून दोन सिलेंडर टाक्यांची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानुसार येथील पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घरफोडी दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० ते दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० या मुदतीत घडली.
हि फिर्याद महेश बाळा विचारे (५५) यांनी दिली आहे. फिर्यादी महेश विचारे यांचे मावस भाऊ यांच्या धामणी येथील घराच्या मुख्य दरवाजाचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने कड़ी कोयंडा तोडून, आत प्रवेश करून, बेडरूममधील कपडे अस्ताव्यस्त करून किचनमधील ६,००० /- रुपये किंमतीच्या दोन लाल रंगाच्या भारत गॅस कंपनीच्या दोन सिलेंडरच्या टाक्या (प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या ) चोरून नेल्या आहेत. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.









