बहिरवली मोहल्ल्यातील;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील बहिरवली मोहल्ल्यातील एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरातील ९,६०० रुपये किंमतीची भांडी चोरून पोबारा केला आहे.
याबाबतची फिर्याद इकबाल हुसैन अली चौगुले (६९) यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरोधान गुन्हा दाखल केला आहे. हि चोरीची घटना दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या मुदतीत घडली आहे.
फिर्यादी इकबाल हुसैन अली चौगुले व त्यांची पत्नी चिपळूण येथे राहत असताना त्यांची आई मूळ गांवी बहिरवली येथे राहत असल्याने तिच्या जेवणासाठी त्यांनी शेजारी राहणाऱ्या रेशमा अफसर मलीक यांच्याकडे सोय केलेली होती. त्यादरम्यान त्यांची आई घराचा दरवाजा उघडा ठेवत होती. तसेच त्यांची वयोवृद्ध आई एकटी असल्याने व तिला कमी दिसत असल्याचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञान चोरट्याने बेडरूममधील माळ्यावर ठेवलेल्या दोन गोणीतील १,५०० रुपये किंमतीचा एक गोलाकार तांब्याचा हंडा, ८०० रुपये किंमतीची एक तांब्याची गोल परात, १००० रुपये किंमतीची तांब्याची पाच जेवणाची ताटे, १००० रुपये किंमतीचा एक तांब्याचा तसकिटली सेट, ४००० रूपये किंमतीचे पाच तांब्याचे लहान-मोठे टोप व १००० रुपये किंमतीची एक तांब्याची शिकारी व पाण्याचा लोटा अशी एकूण ९ ,३००रुपये किंमतीची भांडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.











