माखजन | वार्ताहर
अंशतः अनुदानित शिक्षकांची होत असलेली फरपट मी स्वतः बघत आहे.अंशतः अनुदानित शिक्षकांना शासनाकडून न्याय मिळवून देणारच असल्याचा विश्वास मराठा कुणबी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड तुकाराम शिंदे यांनी दिला.ते मुंबई आझाद मैदानावर अंशतः अनुदानित शिक्षकांना संबोधित करताना बोलत होते.
ॲड.तुकाराम शिंदे म्हणाले की, या आंदोलनाचा मी काही लाभार्थी नाही.पण समाज सेवा करताना, समाजातील शिक्षकच उपेक्षित असलेले चित्र बघवत नाही.म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर हे हा विषय नक्की सोडवतील असा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने,नाईलाजाने काळा शिक्षक दिन,काळी दिवाळी साजरी करावी लागते व सरकार चे वारंवार लक्ष वेधून घ्यावे लागते.हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही. पण आत्ताचे सरकार हे सर्व जाणते असे नमूद केले. राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना हक्काचा पगार हा मिळालाच पाहिजे.व तो मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.
ॲड तुकाराम शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असून,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विश्वासू समजले जातात,अंशतः अनुदानित शिक्षकाना मागील टप्पा वाढ मिळण्यात व ११६० कोटींची शासन दरबारी निधी मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे.
सध्या आझाद मैदान मुंबई येथे गेले ३६ दिवस शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे.जय अनुदान,जय अनुदान घोषणा देत आझाद मैदान दुमदुमून जात आहे.
येत्या आठवड्यात सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ अनुदान घोषित करण्याचा निर्णय होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक समन्वय संघाकडून प्रा राहुल कांबळे,प्रा संतोष वाघ,प्रा अनिल परदेशी,प्रा कैलास खानसोळे,प्रा गजानन काकड,प्रा रत्नाकर माळी, प्रा भारत शिरगावकर,प्रा संघपाल सोनोने,प्रा कर्तारसिंग ठाकूर,प्रा चंद्रकांत बागणे,के.पी.पाटील प्रा.सुशील रंगारी,भारत जामनिक,पुंडलिक काका रहाटे,आदींसह अन्य समन्वयक शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.











