वेंगुर्ले : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परबवाडा ग्रामपंचायत च्या वतीने प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फळे तथा गोड खाऊ वाटप करण्यात आले. नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून परबवाडा गावात विकास कामे ही प्रगतीपथावर आहेत. अशा या महान कार्यधुरंदर, लोकाभिमुख, व्यक्तीमत्वाच्या उत्कर्षरूपी कर्तृत्वामुळे परबवाडा गाव आता बहरतो आहे. निश्चितच येत्या काही नजिकच्या वर्षांत परबवाडा गाव हा सुजलाम सुफलाम होईल. अशा या थोर व्यक्तीमत्वाचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात परबवाडा गावात आज साजरा करण्यात आला.
नामदार रवीदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी परबवाडा ग्रामपंचायत सरपंच सौ. शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा का. सदस्य मनवेल फर्नांडीस, माजी सभापती सारिका काळसेकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत ग्राम सदस्य स्वरा देसाई, कार्तिकी पवार अरुणा गवंडे, सुहीता हळदणकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, सायमन आल्मेडा, नामदेव सरमळकर, मनोहर तांडेल, शाळेचे मुख्याध्यापक झोरे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब. अंकिता देसाई, नयना सावंत, सौ. गायचोर आदी उपस्थित होते.












