युवतीची छेडछाड, विनयभंग प्रकरणी संशयित आरोपींना देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी 

 

 

 

देवगड l प्रतिनीधी :देवगड एसटी स्टॅण्डमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने देवगड वासिया उपस्थित असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपींना देवगड न्यायालयात हजर करण्यात आले.