रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळील वडापावच्य गाडीवरून मोबाईलची चोरी

रत्नागिरी :
रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार ६ डिसेंबर रोजी पहाटे 4 वा. सुमारास गणेश वडापाव सेंटर येथे घडली. फिर्यादी उमेश प्रकाश सुर्वे ( ५०, रा. मुळे वारपडवाडी, वरची निवेंडी, रत्नागिरी. सध्या रा. जय गणेश वडापाव सेन्टर, रेल्वेस्टेशन-रत्नागिरी) यांनी आपला मोबाइल वडापावच्या गाडीवर ठेवला असताना चोरट्याने तो पळविला. या प्रकरणी उमेश सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.