विवली गावात शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का

 

आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील विवली येथे शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का बसला असून विवली केळंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम आज मंगळवारी विवली येथे पार पडला. किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत विवली आणि केळंब गावाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी किरण सामंत आगे बढो हम तुम्हारे साथ है……..! च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

 

 

यावेळी केळंबे विवली ग्रामपंचायतीचे
माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य कैलास खानविलकर ,माजी सरपंच व सदस्य विजय खानविलकर, माजी शाखाप्रमुख अनंत गुरव, माजी सरपंच दीपक जठार, माजी सरपंच सुगंधा जठार,माजी सरपंच व सदस्य जयश्री गुरव ,वाडी प्रमुख अनिल चव्हाण, दशरथ चव्हाण, शरद चव्हाण, प्रदीप खानविलकर, प्रभाकर कांबळे ,विनोद चौगुले, मंगेश घोले ,दीपक भितळे, अशोक जाधव, यशवंत चव्हाण, विलास जाधव, दीपक बने, निलेश चव्हाण संजय चव्हाण प्रभाकर गुरव, रामचंद्र चव्हाण संदीप संनगले ,सुनील घोले ,महादेव बने, स्वप्नील सकपाळ, प्रकाश भित्रे,विजय चव्हाण ,नारायण चव्हाण जयेश चव्हाण अमोल चव्हाण, अक्षय जाधव तसेच केळंबे गावातील सुरेद्र वालकर, संदेश वालकर, विलास शेलार, संजय वालकर यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.