हिंदळे येथे विविध विकासकामांची आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

हिंदळे येथील विविध विकास कामांची भूमिपूजन हे आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडली. आमदार नितेश राणे यांनी हिंदळे ग्रामपंचायतमध्ये गावातील विविध समस्या आणि विकासकामांबाबत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आहे.

आमदार नितेश राणे यांनी यावेळी प्रजिमा क्र. १४ पासून हिंदळे काळभैरव मंदिर बाणाची प्र.रा.मा. क्र. ४ ला मिळणारा मार्ग ग्रा.मा. क्र. ३२२ किमी ०/० ते १/० मध्ये खडीकरण डांबरीकरण. (ता. देवगड – रु. २० लाख), प्र.जि.मा. क्र. १४ पासून हिंदळे सडा, मुणगे सडा, भंडारवाडी, लब्देवाडी, मुणगे मंदिर ते प्र.रा.मा. क्र. ४ ला मिळणारा मार्ग ग्रा.मा. क्र. ३२४ किमी ०/० ते ४/७०० मध्ये मजबुतीकरण व संरक्षण भिंत बांधणे. (ता. देवगड – रु. २० लाख),हिंदळे तिन पिंपळ ते चिंबे घर रस्ता खडीकरण डांबरीकरण. (रु. ७ लाख) करणे या कामाची भूमिपूजन केली यावेळी त्यांच्यासोबत

प्रकाश राणे, भाई पारकर, सावी लोके, भाई नरे, गोविंद सावंत यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते