धामापुर तलाव येथे स्वच्छता मोहिम व वृक्ष लागवड!

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनविभागाचा उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर* वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र धामापुर मधील धामापुर तलाव येथे स्वछता मोहिम व वृक्ष लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रमास उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा , सहा.वनसंरक्षक डॉ.श्री.सुनिल लाड, सहा.वनसंरक्षक श्री.वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि.श्री.सचिन शिरतुडे तसेच कुडाळ रेंज चे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, ग्रामपंचायत धामापूर सरपंच श्रीम.परब मॅडम,उपसरपंच श्री.निवतकर,सम्यंतक संस्थेचे सभासद व ग्रामस्थ याच्या सहभागातुन धामापूर तलाव लगत वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवांस घातक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा व सरपंच धामापूर यांचे हस्ते वनक्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले. अशाप्रकारे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.