आप्पासाहेब गोगटे यांचे विचार कायम जनमानसामध्ये रहावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव :आ. नितेश राणे

देवगड येथील प्रशिक्षण संस्थेचे आप्पासाहेब गोगटे उद्योग औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण

⭕ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण

 

स्व स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. आप्पासाहेब गोगटे यांचे विचार जनमानसात कायम राहावेत, व्यक्ती म्हणून त्यांची थोरवी कायम लक्षात राहावी यासाठी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देवगड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने उत्तम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करावे अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.

आमदार नितेश राणे यांनी आज देवगड औद्योगिक शिक्षण संस्थेचे नामकरण स्वर्गीय आप्पासाहेब गोखटे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे झाल्याचे जाहीर झाले केले. हे नामकरण शासनानेच शासनादेश काढून केले आहे. यावेळी त्यांनी बोलताना माझे वडील खासदार नारायण राणे व आप्पासाहेब गोगटे यांनी एकत्र काम केले आहे. या आदरापोटी आपण आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देवगड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यासाठी आग्रह धरला होता. माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी देवगड चा विकास करण्यासाठी फार मोठी भूमिका बजावली आहे असे मतही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी आप्पासाहेब गोगटे यांनीच ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवगड येथे आणली. जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून ही जमीन मिळवली व ही इमारत उभी केली. यामुळे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अप्पासाहेबांचे नाव मिळणे गरजेचे होते असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष राजेंद्र शेटे, संतोष किंजवडेकर, शरद ठुकरुल व सर्व नगरसेवक, देवगड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस एल कुसगावकर व सर्व शिक्षक वर्ग योगेश पाटकर, देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा ओगले व अप्पासाहेब गोगटे यांचे पुत्र प्रकाश गोगटे अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.