खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील भरणे येथे मुख्यालय असलेल्या कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्थेला यावर्षी देखील सलग तिसऱ्यांदा लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. या पतसंस्थेने अल्पावधीत १४ कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पार केला असून, संस्थेची वाटचाल वेगाने सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष उमेश नक्षे यांनी दिली.
कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्थेची व अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली.
यावेळी संस्थाध्यक्ष उमेश नक्षी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, संस्थेने गेल्या घेतला. ते म्हणाले की, संस्थेने गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये मोठा टप्पा गाठला असून, १४ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेवरील सभासदांच्या विश्वासामुळेच संस्थेला हे यश मिळू शकले. यावर्षी देखील तिसऱ्यांदा संस्थेला सलग लेखापरीक्षण वर्ग अ प्राप्त झाला आहे. संस्था सुरुवातीपासूनच आर्थिक मागास बेरोजगार दलित यांना मदतीचा हात देण्याचे धोरण राबवत आहे.
. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेच्या नावावर वीस लाख ७५ ह ९३६ एवढी जिल्हा बँकेमध्ये गुंतवनुक आहे. सन २०२३-२४ मध्ये संस्थे १७ कोटी ४ लाख २६ हजार ५९२ खेळते भांडवल आहे. संस्थेने सुसज्ज असे संगणकीकृत कार्यालय उभे असून, तत्पर व विनम्र सेवा सभासद देण्यासाठी कर्मचारी प्रयत्न असतात. संस्थेने ठेवीदार लाभ देण्यास अधिकाधिक अल्पमुदत व दीर्घ मुदतीच्या विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचा सभासदांनी घ्यावा, असे आवाहन यांनी यावेळी केले.








