मेढा ग्रा.पं. च्या ग्रामसचिवालय इमारती चे पं. स. गटविकास अधिकारी यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

 

 

परुळे l प्रतिनिधी :विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मेढा च्या ग्रामसचिवालय इमारती चे भूमिपूजन शनिवार 12 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री दिनेश पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

मेढा येथील ही शासकीय इमारत स्व. बाबासाहेब ठाकरे मातोश्री योजना ग्रामपंचायत इमारत बांधणे यानिधीतून 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री .महादेव शिंगाडे, उपअभियंता पाणी पुरवठा श्री प्रफुल्ल कुमार शिदे साहेब, सरपंच श्री अवधूत रेगे, किंजवङे ग्रामपंचायत अधिकारी श्री शिवराज राठोड, ग्रामपंचायत अधिकारी श्री शरद शिंदे, उपसरपंच. श्री गोविंद जाधव सदस्यांसह माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय मेढा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील ग्रामस्थांच्या बर्‍याच दिवसांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे एक सुसज्ज ग्रामपंचायत इमारत येथे उभी रहाणार आहे.