वैभववाडी प्रतिनिधी :
तिथवली काझीवाडी येथील अय्युब उमर इसफ वय-७५ या वृध्दाचा शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तलावात मृतदेह आढळुन आला. काल दुपारी पावणेचार वाजता ते बकऱ्यांना घेवुन घरामागील माळरानावर गेले होते.
श्री.काझी हे शेळीपालन करतात. शुक्रवारी सायकांळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरामागील माळरानात बकऱ्यांना चरावायस सोडले होते. सायकांळी सहा वाजेपर्यत ते घरी येणे अपेक्षित होते. परंतु ते घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांना त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु श्री.इसफ हे आढळुन आले नाहीत. त्यामुळे पोलीसांना माहीती देण्यात आली. त्यानतंर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, हरेष जायभाय, रणजित सावंत हे तिथवलीला पोहोचले. त्यांनी देखील स्थानिकांच्या मदतीने परिसरात शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळुन आले नाहीत. दरम्यान आज सकाळी सात वाजल्यापासुन पुन्हा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली असता गावातील तलावात श्री.इसफ यांचा मृतदेह दिसुन आला. स्थानिकांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यांचे चप्पल तलावाकाठी होते. ते तलावात आंघोळीकरीता गेले असताना पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे. या प्रकरणी अबिद अली उमर काझी यांनी पोलीसांत खबर दिली आहे.













