बंगळुरु येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत, बस चालक किरण यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. किरण हे नेलमंगला ते यशवंतपूर मार्गावर बीएमटीसी बस चालवत असताना छातीत तीव्र वेदना जाणवून अचानक बेशुद्ध झाले, ज्यामुळे बसवरचे त्यांचे नियंत्रण सुटले. या घटनेमुळे बस रस्ता सोडून दुसऱ्या बसला धडक देण्यास सुरुवात केली.
बंगळुरुत ही घटना घडली आहे. सोमवारी यशवंतपूरजवळ बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) चालकाचं दुःखद निधन झालं. किरण असं या 39 वर्षीय चालकाचं नाव आहे. बीएमटीसी डेपो 40 मध्ये काम किरण नेलमंगला ते यशवंतपूर दरम्यान बस चालवत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या त्याची शुद्ध हरपली.
या वेळी बसमधील कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत त्वरित चालकाच्या सीटवर येऊन बस थांबवली. कंडक्टरच्या या धाडसामुळे मोठा अपघात टळला. पुढे किरणला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
ही घटना बीएमटीसी कर्मचाऱ्यांमधील वाढत्या हृदयविकाराचा धोका समोर आणते. गतवर्षी करण्यात आलेल्या एका आरोग्य विश्लेषणातून असे आढळले आहे की, बीएमटीसीचे बरेच कर्मचारी हृदयविकार, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करत आहेत.










