सावंतवाडी । प्रतिनिधी : सिधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ,मुंबईच्यावतीने स्व. जॉन पिंटो जीवन गौरव पुरस्कार माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जोवेल डिसिल्वा यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण जनजागृती क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लवकरच मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे.
जोवेल डिसिल्वा गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक व पर्यटन जनजागृती क्षेत्रात कार्यरत आहेत. आय टी आय उत्तीर्ण झालेल्या तरुणांना अप्रेंटिसशिपबाबत तसेच नोकरी विषयी गेली २५ वर्षे मार्गदर्शन करून आज बरेच विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नोकरीत आहेत. तसेच स्वयं रोजगार बाबतीत मार्गदर्शन, रक्तदान बाबतीतही मुलांना मार्गदर्शन व जनजागृती ते करीत असतात. त्यांनी स्वतः रकदान चळवळीत सक्रिय सहभाग तसेच पर्यावरण रक्षणासाठी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात सहभागी होत असतात. कोविड काळामध्ये लोकांच्या सेवेसाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत सिधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ,मुंबईच्यावतीने स्व. जॉन पिंटो जीवन गौरव पुरस्कार माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जोवेल डिसिल्वा यांना जाहीर करण्यात आला आहे.लवकरच मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












