डॉज बॉल स्पर्धेत सैतवडेतील दि मॉडेल इंग्लिश स्कुल जिल्हा स्तरावर प्रथम

 

सतरा वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय डॉज बॉल स्पर्धा नुकत्याच डेरवण येथे पार पडल्या.एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.पहिल्या फेरीत पोतदार हायस्कूल रत्नागिरी ,दुस-या फेरीत फुरुस हायस्कूल व तिसऱ्या फेरीत सेंट थॉमस हायस्कूल रत्नागिरी वर मात करून सैतवडे संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावले आहे. या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

 

 

या संघात अंतरा अनंत वरवटकर,प्रिया मंदार अजगोलकर,नंदिनी रविंद्र जाधव,रिया कैलास पावसकर,अन्वया निलेश पावरी,धनश्री नारायण बळकटे,ऋतुजा रविंद्र डोर्लेकर,अंतरा संतोष डोर्लेकर,सई देवचंद्र पावरी,अक्षरा विनोद झर्वे या खेळाडूनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षिका ऋतुजा राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.