हायस्पीड ट्रॉलरच्या कारवाईत निलेश राणे यांची खंबीर भुमिका ठरली निर्णायक : मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल
मालवण | प्रतिनिधी : मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर धुमाकूळ घालत मत्स्यसंपदा लुटून नेत होते. या ट्रॉलरवर धडक कारवाई करत मत्स्यविभागाने शनिवारी ट्रॉलर पकडला. याचे श्रेय माजी खासदार निलेश राणे यांचेच आहे. मच्छिमार बांधवांच्या वतीने निलेश राणे यांचे आभार. अश्या भावना सर्जेकोट येथील मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी व्यक्त केल्या आहेत. सोबतच मत्स्य विभागाने असेच सातत्य कारवाईत यापुढेही कायम ठेवावे असे सांगत मत्स्य विभागाचेही कौतुक केले.
स्थानिक मच्छिमार यांच्या मासेमारी जाळ्यांचे हायस्पीड ट्रॉलर मोठया प्रमाणात नुकसान करतात. मच्छिमारांच्या छोट्या बोटिंच्या अंगावर येतात. मासळीची लूट करतात. यामुळे स्थानिक मच्छिमार हवालदिल झाले. याप्रशनी मच्छिमार शिष्ठमंडळाने काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांची भेट घेतली होती. यावेळी निलेश राणे यांनी मच्छिमारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. तसेच मत्स्य अधिकारी यांना संपर्क साधून हायस्पीड बोटिंवर कारवाई झालीच पाहिजे अशी भुमिका आठ दिवसांपूर्वी मांडली होती. मत्स्य विभागानेही गस्ती मोहीम तीव्र केली होती. याचं दरम्यान शनिवारी पहाटे मालवण तारकर्ली येथे मलपी येथील हायस्पीड बोट पकडली. सर्जेकोट येथील मच्छिमारांचे मोठे सहकार्य मिळाले. एकूणच झालेली कारवाई निलेश राणे यांच्या ठोस भूमिकेतून व खंबीर पाठिंबा यामुळे झाली. असे सांगत कृष्णनाथ तांडेल यांनी निलेश राणे यांचे मच्छिमारांच्या वतीने आभार मानले.
तसेच कायद्यात बदल करून अन्य राज्यातील ज्याबोटी दुसऱ्या राज्यात सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करतील त्यावर कठोर कारवाई व्हावी. दंडाची अर्धी रक्कम ज्या मच्छिमारांची जाळी तुटून झाले त्या स्थानिक मच्छिमारांना मिळावी. कायदे कठोर करावेत. यासाठी निलेश राणे यांची भुमिका आगामी काळात मच्छिमारांना दिलासा देणारी ठरेलं. असेही तांडेल म्हणाले.
यावेळी दिलीप घारे यांनीही मच्छिमार हिताच्या दृष्टीने कठोर कारवाईची भुमिका मांडली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनीही कारवाईचे स्वागत केले. मत्स्य विभागाने कारवाई सतत सुरु ठेवावी. हायस्पीड ट्रॉलरचा त्रास स्थानिक मच्छिमारांना होता नये या दृष्टीने मत्स्य विभागाने गस्त व कारवाई यात सातत्य ठेवावे. निलेश राणे स्थानिक मच्छिमारांच्या सोबत असल्याचे अशोक सावंत, बाबा परब यांनी सांगितले. तसेच स्थानिक मच्छिमार यांच्याशी संवाद साधला.
यावेळी जेष्ठ मच्छिमार नेते कृष्णनांथ तांडेल यांसह दाजी सावजी, दादा सावजी, भाऊ मोरजे, छोटू सावजी, दिलीप घारे, वसंत गांवकर, संतोष पाटील, वसंत आडकर यांसह मच्छिमार, पदाधिकारी उपस्थित होते.










