उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची टीका 

दिल्ली समोर झुकत नाही म्हणणाऱ्या ठाकरे,राऊत ना आता कंबर पट्टा लागणार 

पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मानले भाजप पक्षाचे आभार

 

उबाठा [Ubatha] च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस [Congress] च्या दहा जनपथ [10 Janpath] ला स्क्रीनिंग [screening] साठी गेली आहे. 10 जनपथ ची मम्मी जेव्हा शिक्का मारेल तेव्हा यादी बाहेर येईल. आम्ही दिल्ली [Delhi] समोर झुकत नाही असं म्हणणारे राऊत [Raut] आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे [Uddhav Thackeray] आता मानेचा पट्टा आहेच, मात्र लवकरच कमरेचा पट्टा लावण्याची वेळ काँग्रेस वाले आणतील. उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी [Rahul Gandhi] यांनी मातोश्रीवर यावं असं वाटत होतं, पण कोण तरी वेगळेच माणूस आले. यातून काँग्रेस पक्ष उबाठा पक्षाला काय किंमत देत असेल हे दिसते. या सर्व प्रकारातून खोदा पहाड निकला चुहा, अशीच अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे, अशी टीका भाजप [BJP] प्रवक्ते आमदार नितेश राणे [MLA Nitesh Rane] यांनी केली.

 

आमदार नितेश राणे यांनी कणकवली [Kankavli] येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभेच्या या स्पर्धेत आम्ही महायुती [Mahayuti] म्हणून एक नंबर वर आहोत. महाविकास आघाडी [Mahavikas Aghadi] मध्ये गँगवार [gang war] सुरू आहे, ते संपणार नाही. बिगबॉसच्या [Bigg Boss] हाऊस पेक्षा चांगलं दृश्य त्या फाईव्ह स्टार हॉटेल [Five Star Hotel] मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मिटिंग [meeting] मध्ये दिसतं. एकमेकांचा पत्ता कसा कापायचा, हेच त्यांचं चालले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा तुमच्या घरातील गँगवॉर थांबवावा, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.

 

महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा आज सुटणार नाही. 28 तारीख पर्यंत हे लोक कपडे फाडे पर्यंत भांडत राहणार आहेत. ह्यांना काँग्रेस भीक घालत नाही. हे लाचार झालेले लोक आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेची [Shiv Sena] बाळासाहेबांची पद्धत विसरला असेल, तर ती आठवावी. तेव्हा उमेदवारांची यादी सामना [Saamana] मधून अधिकृत यायची, आता दहा जनपथ वरून येत आहे. बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली देण्याचा यांचा निर्णय आहे. काँग्रेस हायकमांड [High Command] किस खेत कि मुली है हे अजून राऊतला माहित नाही. काँग्रेस हायकमांड म्हणजे काय हे अजून उद्धव ठाकरे यांना कळलेलं नाही. शेंबुड पुसत रडण्याची वेळ येईल, तेव्हा सोबत कोण नसेल आणि काँग्रेस काय आहे, हे कळेल.

पक्षाने दिलेले कार्यक्रम तळागाळात पोचविण्याचे काम कार्यकर्ता म्हणून मी करत आहे. जो कार्यकर्ता मेहनत करतो त्याच्यावर पक्षाच्या नेतृत्वाची नजर असते. आम्ही केलेल्या कामाची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. आम्ही जनतेची आणि पक्षाची सेवा करत राहणार. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी [PM Narendra Modi], गृहमंत्री अमितभाई शहा [Home Minister Amit Shah], राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा [National President J.P. Nadda], उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस [Deputy CM Devendra Fadnavis], प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे [State President Chandrashekhar Bawankule], माजी मंत्री खासदार नारायण राणे [Ex-Minister Narayan Rane], पालकमंत्री रवींद्र चव्हाण [Guardian Minister Ravindra Chavan], या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि उमेदवारी दिली, त्या बद्दल मी आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे  यांनी दिली