केसरकर यांच्या विजयासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : निलेश राणे

 

 

माझे सर्व सहकारी केसरकर यांच्यासोबत 

सावंतवाडी । प्रतिनिधी : वयाच्या २८ व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवीत असतान माझ्या प्रचारासाठी सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात जाऊन दीपक केसरकर यांनी प्रचार केला होता. अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली होती. आता त्याची परतफेड करण्याची आमची वेळ आहे. संजू परब यांच्यासह माझे सर्व सहकारी तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे तुमच्या विजयासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, अशी ग्वाही माजी खासदार तथा महायुतीचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी दिली.

सावंतवाडीचे आमदार म्हणून मंत्री दीपक केसरकर हेच शोभून दिसतात. त्यांच्या समोर त्या तोडीचा कोणी उमेदवार राहिला नाही. विरोधकांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही. तुम्ही केलेले काम व तुमच्यावरील प्रेम यामुळेच तुम्हाला आशिर्वाद देण्यासाठी भर उन्हात लोकं रस्त्यावर उतरली आहेत. या जनतेसोबत आम्ही देखील ठामपणे उभे असून त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक करणार, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला.