महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीचे रक्तदान शिबिर संपन्न
कणकवली (प्रतिनिधी)
“रक्तदान हेच जीवनदान” हे ब्रीदवाक्य घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम हा सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते भाई चव्हाण यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम म्हणाले, शिक्षक समिती सामाजिक बांधिलकी ठेवून रक्तदानासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना आहे.
कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानातील ‘काशीभवन’ येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने शिक्षक समिती कणकवलीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शिक्षक समिती कणकवलीच्या माध्यमातून वर्षभर शिष्यवृत्ती मार्गदर्शन, दत्तक विद्यार्थी, पालकत्व हिरावलेल्या तसेच आजारी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीचे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, सरचिटणीस महेंद्र पवार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, सचिव वैभवी कसालकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर, मालवण शिक्षक नेते मंगेश कांबळी, तालुका महिला आघाडी प्रमुख नेहा मोरे, शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे, प्रवक्ता विनायक जाधव, आरोग्य पथक प्रमुख डॉ. सिमी मॅडम व त्यांचे सहकारी, कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, कार्यालयीन सचिव समीर पाटील, महासचिव संतोष कांबळे, विभाग अध्यक्ष हेमंत राणे, सुनिल कदम इत्यादी समितीचे पदाधिकारी आणि रक्तदाते उपस्थित होते.
यावेळी रुपेश गावकर, अमित हर्णे, निलेश कडुलकर, श्रीकृष्ण कांबळी, निलेश ठाकूर, वल्लभानंद प्रभू, प्रशांत दळवी, उदय जाधव, नवनाथ चौगले, ईश्वरलाल कदम, शांती बोभाटे, संतोष कुडाळकर, विलीस चोडणेकर, धीरज हुंबे, विनायक जाधव, श्रीकांत बुचडे, संतोष राणे ज्ञानेश जोशी, दीपा काकतकर, सदानंद ठाकूर, संतोष कांबळे, नंदकुमार सरंगले, किरण कोरगावकर, टोनी म्हापसेकर, संदीप जाधव, सिद्धिविनायक पारगावकर, संजय तांबे, उदय पवार आणि आनंद तांबे असे एकूण २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केल्याबद्दल तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले. यावेळी बहुसंख्येने संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.