रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या कोकणनगर येथे प्रौढ घरात मृत अवस्थेत मिळून आला. ही घटना शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. उघडकीस आली.
महेश रामचंद्र पांचाळ (54, रा.कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. महेश पांचाळ हे आपल्या घरी एकटेच रहात होते. शनिवारी ते घराबाहेर कुठेही दिसून न आल्याने त्यांच्या शेजार्यांनी त्यांच्या घरात जाउन पाहिले असता त्यांना महेश पांचाळ घरात मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.











