*देवरुख (प्रतिनिधी)* महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ अभिनेते भाऊ कदम यांची शनिवारी देवरुखात प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम हे पुन्हा निवडणुक रिंगणात आहेत. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत देवरुख शहरातील प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय येथून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, बाजारपेठ, माणिक चौकमार्गे सोळजाई देवी मंदिर अशी ही प्रचाररॅली काढण्यात आली. या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या रॅलीवेळी राष्ट्रवादीचे हनिफ हरचिरकर, पंकज पुसाळकर, बाळु ढवळे, दुर्वा वेल्हाळ, प्रफुल भुवड, भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, संतोष केदारी, सुशांत मुळ्ये, कुंदन कुलकर्णी, शिंदे गटाचे बाबु मोरे, रूपेश माने, सचिन मांगले, प्रसाद सावंत यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.










