सह्याद्री कुणबी संघातर्फे १९ रोजी क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) सह्याद्री कुणबी संघ पुणे शहराच्या वतीने १९ जानेवारी रोजी सह्याद्री चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यास २२,२२२ रुपये, उपविजेत्यास ११,१११ रुपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे.
उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. पराभूत संघांनाही सहभाग चषक देवून गौरवण्यात येणार आहे. कोकणातील क्रिकेटप्रेमींना विशेष व्यासपीठ मिळून सामाजिक कार्यात मदत व्हावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन केले आहे. यशस्वीतेसाठी सतीश डाकवे, संजय पानकर, उमेश बुरटे, सचिन घडशी, सागर धुलप, प्रदीप खांबे, नितीन शिगवण, अभिषेक पानकर, सतिश भुवड आदी प्रयत्नशील आहेत.