M Cricket Academy players will shine at state and national level: Manish Dalvi
अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांच्या माध्यमातून खेळाडूंना जर्सीचे वितरण
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचे कार्य उत्कृष्ट असून या अकॅडमीत चांगल्या रितीने प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच उत्तमोत्तम क्रिकेटर बनण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. त्यामूळे भविष्यात या अकॅडमीचे खेळाडू निश्चितच राज्य व देश पातळीवरही चमकतील, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांचेही त्यांनी कौतुक करीत अकॅडमीच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीच्या इनडोअर मैदानात आपल्या नवीन जर्सीचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एम क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, अकॅडमीचे सदस्य प्रसाद सावंत, प्रशिक्षक राहूल रेगे, अविनाश जाधव यांच्यासह खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.
नवीन जर्सीमध्ये सर्व मूलांना सरावासाठी, फिटनेससाठी व प्रत्यक्ष सामन्यासाठी जर्सी व ट्रॅकपॅन्ट अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. यावेळी उपस्थित खेळाडू व पालकांनी समाधान व्यक्त केले. एम अकॅडमी चांगले काम करीत असून भविष्यात आमच्या मुलांना चांगले खेळाडू म्हणून संधी मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पालकांनी व्यक केला.