सुभाष राऊळ यांची भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष पदी नियुक्ती

 

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली येथील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख सुभाष राऊळ यांची आंबोली मंडल उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र आमदार नितेश राणे यांनी सुभाष राऊळ यांना प्रदान केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.