पक्षादेश शिरसावंद्य मानून नातू दाम्पत्य रंगले प्रचारात

खेड(प्रतिनिधी) पक्षनिष्ठा – आदेश या साऱ्या गोष्टी सद्यस्थितीतल्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी यांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. परंतु केवळ पक्षादेश मानून हे दाम्पत्य आज गेली अनेक वर्षे कोकण पट्ट्यात आपल्या पक्षाचा अजेंडा घरोघरी पोहचवण्याचे काम करित आहे. हे दाम्पत्य म्हणजे भाजपचे माजी आ. डाॅ. विनय नातू आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. विनीता नातू होय.
 जनसंघापासूनच नातू कुटुंबातील सर्वच सदस्य हे पक्षादेश पाळत आलेले आहेत. मोठ्या संघर्षातून जनसंघाचे कोकणातील पहिले आमदार डॉ. तात्यासाहेब नातू ठरले. त्यानंतर मात्र डॉ. नातू यांचे वैद्यकीय सेवेतील वैशिष्ट्यपूर्ण योगदान आणि प्रत्येकाशी असलेला वैयक्तिक लळा यामुळे पुढे तब्बल २५ वर्षे आमदार म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विनय नातू यांनी २० वर्षे आमदार म्हणून उत्तम कामगिरी केली. गेली १५ वर्ष डॉ. नातू यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने संभाळली आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. सौ. विनीता नातू या देखील पक्ष संघटना बांधणीसाठी झटत आहेत.
सौ. नातू यांनी गुहागर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यातून महिला वर्गासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग, शिबीरे यांचे आयोजन करुन महिला सबलीकरणासाठी विशेष पाऊल उचलले आहे. महिला पतसंस्था, किशोर वयीन मुलींकरता हितगुज उमलत्या कळ्यांची हा कार्यक्रम, बचत गटांना प्रशिक्षण, आर्थिक परिस्थिती कमी त्या विद्यार्थी – विद्यार्थीनी यांचे शिक्षण, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत,  मुलांचे वसतिगृह असे विविध उपक्रम सौ. नातू राबविले आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे पक्ष बांधणीसाठी योगदान पाहून
यावेळची विधानसभा आपल्याला लढवायची आहे. त्या अनुषंगाने तयारीला लागा असा वरिष्ठांचा आदेश मिळताच  डॉ. नातू यांच्या सह पत्नी सौ. विनिता देखील मतदार संघात सक्रिय आहेत. परंतु महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे सेने कडे गेला. त्यामुळे गेली पंधरा वर्षे या मतदारसंघात भाजप चे कमळ फुलेल या आशेवर असलेला भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कोलमडून गेला. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गावागावात बैठका घेऊन भाजप श्रेष्ठींसह महायुतीच्या मुख्य नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली. परंतु एका मतदार संघामुळे महायुतीत कुठेही कटूता येऊ नये या दृष्टिकोनातून डॉ. नातू यांनीच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प सोडला. सद्यस्थितीत गुहागर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा गावागावात वाडी वस्तीवर जाऊन प्रचार करताना डॉ. नातू व त्यांच्या पत्नी डॉ. विनिता नातू दिसून येत आहेत. त्यामुळे पक्ष आणि निष्ठा – वरिष्ठांचा आदेश आणि पक्षाचे ध्येय बाळगणारे हे दाम्पत्य म्हणजे सध्याच्या काळातील एक आदर्शच म्हणावे लागेल.