उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी वाळू कामगारांना आणण्याचे उबाठाचे नियोजन

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा आरोप 

वैभव नाईकांचा पराभव निश्चित 

निलेश राणे 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार 

मालवण | प्रतिनिधी : मालवणात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद मिळतं नसल्याचे पाहून वाळू उपसा कामगारांना एकत्रित करून त्यांना चांगला पेहराव देऊन सभेला नेऊन गर्दी करण्यासाठी उबाठा कार्यकर्त्यांनी वाळू व्यवसायिकांशी फोनाफोनी सुरु केली आहे. अशी नामुष्की व दुर्दैवी वेळ वैभव नाईक यांच्यावर आली आहे. जनतेने नाईक यांना घरी बसवण्याचे निश्चित केले असून महायुतीचे आमचे उमेदवार निलेश राणे ५० हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

दरम्यान, वैभव नाईक आता माजी आमदार म्ह्णूनच राहणार असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह शहराध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, संतोष गावकर, विजय ढोलम, आबा हडकर, मंगेश चव्हाण, कमलाकर कोचरेकर व इतर उपस्थित होते.

यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, मालवण कुडाळ मतदार संघात फिरत असताना प्रत्येक नागरिकाला बदल अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाईक कुडाळ मालवण मतदार संघात काहीतरी खास बाब करतील अशी अपेक्षा होती, मात्र काहीही झाले नाही. विकासकामे करत नसतील तर दहा वर्षे आमदार राहून काय उपयोग? नाईक यांनी केवळ पत्रांचा पाऊस पाडला. आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही, अशी टीका चिंदरकर यांनी केली.

वैभव नाईक यांचा कंपू वेगवेगळ्या मार्गाने टीका करत आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या जात आहेत. जनतेने आपल्याला नाकारले आहे, हे आम्ही. नाईक यांच्या लक्षात आल्याने आशा गोष्टी करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. भाजप आतापर्यंत शांततेच्या मार्गणार निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र नाईक असे काही घडवतील, काहीतरी चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतील की येथील शांतता भंग होईल, असा प्रयत्न आहे. मात्र आम्ही शांत राहणार असेही चिंदरकर म्हणाले.

वैभव नाईक यांना कार्यकर्ते सोडून जात आहेत. कारण नाईक कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत, केवळ आपला विचार करतात. त्यामुळे आज गावच्या गावे परिवर्तीत होऊन भाजप व शिंदे शिवसेनेत जात आहेत. वैभव नाईक हे माजी आमदार बनतील. कारण निलेश राणे यांना निवडून आणायचे असे जनतेने ठरविले आहे. प्रत्येक निवडणुकीतील भाजपची विजयी घोडदौड सुरूच राहील, असेही धोंडी चिंदरकर म्हणाले.