चिखलगाव येथील गोडावून मधून 2 लाख 17 हजार रूपये किंमतीच्या बांधकाम साहित्याची चोरी

 

 

राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील चिखलगाव येथील एका बांधकाम कंपनीच्या गोडावून मधील सुमारे 2 लाख 17 हजार रूपये किंमतीचे बांधकामाला लागणारे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या पकरणी एम.सी.बेटीगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर गणेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजापूर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एम.सी.बेटीगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजापूर-सौंदळ रस्त्यावर चिखलगाव येथे दोन मोठे शटरचे गोडावून असून या गोडावूनमध्ये पुल तसेच रस्त्यांच्या कामाकरीता लागणारे साहित्य ठेवलेले होते. जून 2024 मध्ये तेरवण येथील पुलाचे काम संपल्यानंतर पूल बांधणीचे सर्व साहीत्य सदरच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते. दर चार-पाच दिवसांनी कंपनीचे सुपरवायझर गणेश चव्हाण हे गोडावूनमध्ये जावून पाहणी करत असत. दि.30 आŸक्टोबर रोजी त्यांनी गोडावूनमध्ये जावून पाहणी केली असता सर्व साहित्य जागेवर होते.

त्यानंतर दि.6 नोव्हेंबर रोजी दुपारी चव्हाण हे पुन्हा गोडावूनमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता गोडावूनच्या गेटचे लाŸक व साखळी तुटलेली होती. तर शटरचे लाŸकही तोडलेले होते. तसेच गोडावूनमधील साहित्य देखील जागेवर नव्हते. अज्ञात चोरट्यांनी गोडावूनमधले इलेक्ट्रीक पंप, इलेक्ट्रीक व्हायब्रेटर, राŸकेल पेट्रोल व्हायब्रेटर, राŸकेलवर चालणारे पाण्याचे पंप, लोखंडी घण, काŸपर वायर, सेंट्रींगच्या प्लेटा असे सुमारे 2 लाख 17 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले आहे. यापकरणी गणेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3), 334 अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.