आमदार नितेश राणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी भजनी कलावंतांच्या पाठिंबा

 

 

भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला

नवे सरकार भजनी कलाकारांची काळजी घेणारी असेल

भजनी कलावंत हेच खरे लोकप्रबोधनकार, भजनातूनच लोकप्रबोधन होते, आमदार नितेश राणे

आमदार नितेश राणे यांना देवगड तालुक्यातील भजनी कलावंतांनी पाठिंबा जाहीर केला आहे. येणारे सरकार हे महायुतीचेच असेल आणि भजनी कलावंतांना अनेक सुविधा आपण मिळवून देणार आहोत. भजन कला ही वृद्धिगत व्हायला हवी कारण भजन हे लोकप्रबोधनाचे फार मोठे माध्यम आहे असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

 

महायुती सरकारने कलावंत वृद्ध नागरिक अशा अनेक घटकांची योग्य काळजी घेतली व त्यांना सुविधा दिल्या. भजनी कलावंतांसाठी आपण नक्की प्रयत्न करू असे मत त्यांनी व्यक्त केले

पाठिंबा देणाऱ्या भजनी कलावंतांमध्ये बुवा अजित मुळम, बुवा विनोद सुके, बुवा अजित मुळम, बुवा रविंद्र धावरे यांच्यासह सगळे शिष्यगण उपस्थित होते. उपस्थित होते

 

यावेळी भाजपा पदाधिकारी रवी तीरलोटकर व अन्य पुढील भागातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.