वेंगुर्ले : प्रतिनिधी :महाविकास आघाडी चे उमेदवार राजन तेली हे सावंतवाडी जेलमध्ये होते ते सत्य आहे. त्यांची प्रवृत्ती मी आणि सिंधुदुर्गवासीय ओळखून आहेत.आणि मी बोललो ते खरे आहे. त्यामुळे अब्रूनुकसानीचा दावा करण्याची भाषा तेली यांनी करू नये.मी खर बोललो त्यामुळे एक काय १० कोटीचा दावा केला तरी माफीचा प्रश्नच नाही असे स्पष्ट मत दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
गेले पंधरा वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयांची विकास कामे केली आहेत. अनेक कामे मी मंजूर करून आणली मात्र तेली नारळ फोडून श्रेय घेत होते. मी कधी विरोध केला नाही. कारण त्यांची दुसऱ्यांना फसवण हीच प्रवृत्ती आहे. नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा बँक अध्यक्ष केले मात्र त्यांच्या शिवाय ते पुन्हा त्या पदावर निवडून येऊ शकले नाहीत यावरून त्यांची कुवत लक्षात येते. मतदारांचा विश्वास आज माझा विजय आहे असे केसरकर यांनी सांगितले.












