माखजन हायस्कुल मध्ये टाकाऊ अन्नापासून सेंद्रिय खतनिर्मिती

 

माखजन :वार्ताहर : शाळा शाळांमध्ये दररोज पोषण आहार शिजवला जातो.यावेळी मुलांना वाढल्यावर शिल्लक राहणाऱ्या अन्नाचे काय करायचे हा मोठा प्रश्न प्रत्येक शाळांना भेडसावत असतो.यावर शक्कल लढवत संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल ने या टाकाऊ व खरकट्या अन्नापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यास सुरवात केली आहे.

 

 

पोषण आहारातून शिल्लक अन्न व खरकट खड्ड्यात टाकून किंवा उघड्यावर टाकून दुर्गंधी सुटते.अनेक आरोग्यास हानिकारक प्रश्न भेडसावू शकतात.यावर नामी इलाज म्हणून हा पर्याय सुरू केला आहे.
कमीत कमी अन्न कसं उरेल यावर भर देत,टाकाऊ व खरकट्याचे रूपांतरण सेंद्रिय खतात करण्यावर शाळेत भर देण्यात येत आहे.या मॉडेल बसवण्यासाठी ६ हजार नाममात्र खर्च आला असून, निर्माण होणाऱ्या सेंद्रिय खताचा उपयोग शाळेच्या परसबागेत केला जाणार आहे.