विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : प्रचाराचे दोन दिवस शिल्लक असताना विजयदुर्ग येथील नितेश राणे यांच्या लाडक्या बहिणींनी कंबर कसली असून घराघरात नितेश राणे यांच्या कारकिर्दीतील विकासकामे महिलांच्या निदर्शनास आणून देत आहेत. आमदार नितेश राणे यांची हॅटट्रिक हे एकच ध्येय्य समोर ठेवून मताधिक्य वाढण्पासाठी या रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. विजयदुर्ग भागात झालेले रस्ते. पंतप्रधान निधीतून होत असलेला रामेश्वर मंदिर ते बंदर विजयदुर्ग इतिहासकालीन रस्ता, होवू घातलेला आरमार सृष्टी प्रकल्प , विजयदुर्ग येथील घराघरात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या बाबी विजयदुर्गवासियांच्या मनात घट्ट झाल्या असून विजयदुर्ग येथील मताधिक्य पर्यायाने नितेश राणे यांची हॅटट्रिक होणार हे या निमित्ताने निश्चित झाले आहे.
यावेळी भाजप पडेल मंडल महिला अध्यक्षा संजना आळवे, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा मिठबावकर, महिला शक्ती केंद्र प्रमुख दिपांजली तळेकर,महिला बूथ अध्यक्षा पुर्वा लोंबर, साक्षी सरवणकर, गीता लळीत, माधवी चव्हाण, रुपाली मेस्त्री, वंदना जावकर, शिल्पा केळकर, रुपाली केळकर, विना नागवेकर, सायली पडवळ, रंजना मेस्त्री,शेवंती सनये आदी महिला उपस्थित होत्या.












