महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करू! सौ निलम राणे यांची पळसंब वासियांना ग्वाही

मसूरे | झुंजार पेडणेकर : पळसंब गावात सौ.निलम राणे यांनी भेट देत महिला वर्गाशी संवाद साधला.
महिला शाखाप्रमुख सौ.दक्षता सावंत यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
पळसंब ग्रामदेवता श्री.आई जयंतीदेवी चरणी नतमस्तक होत सौ नीलम राणे यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी मानकरी श्री. अनिल पुजारे यांनी डॉ. निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊदे असे साकडे आई जयंतीदेवी चरणी घातले.
माजी उपसभापती श्री. राजू परुळेकर. सौ. निलम शिंदे, सरपंच श्री महेश वरक, माजी सरपंच सुहास सावंत ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यानंतर महिला शाखा प्रमुख सौ.दक्षता सावंत यांनी सौ निलम राणे यांचे गावाच्या व महिलांच्या वतीने स्वागत केले.
आम्ही डॉ निलेश राणे साहेब यांच्या विजयासाठी मतदारांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो आहोत. त्यांच्या विजयाचा एक भाग आम्हाला बनायचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्यासाठी पळसंब गावातील महिला प्रयत्न करत आहेत.
डॉ. निलेश राणेच्या विजयानतंर पळसंब गावात मेळावा घेवूया असे मनोगत पळसंब शाखा प्रमुख सौ. दक्षता सावंत यांनी व्यक्त केले
पळसंब गावातील महिलांना उद्योग लघु उद्योगासाठी राणे परिवार नक्कीच सहकार्य करेल. गावातील सर्व महिलांनी एक संघ राहावे. सुख दुःखात कधीही हाक मारा असे मनोगत सौ. निलम राणे यांनी व्यक्त केले . तसेच सर्व महिलांशी त्यांनी संवाद साधला .

 

 

त्यावेळी गावातील माजी सरपंच रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, अक्षय परब, अरुण माने आणि रचना पुजारे, राजश्री दिपाली पुजारे, मनोरमा पुजारे, नम्रता सावंत, सुलोचना सावंत, अमिता परब, निकिता सावंत, मृणाली पुजारे, मनीषा सावंत, मंजीरी पुजारे, उज्वला परब, सेजल लाड, मालती सावंत, हर्षदा गोलतकर, अमिता सावंत, अमीता परब, रसिका परब, मालती सावंत, निखिता परब इत्यादी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या