झोपडपट्टीतील मुलांना काऊ व खेळण्याचे केले वाटप
खेड(प्रतिनिधी)
इनरव्हील क्लब लोटे च्या वतीने नुकताच लोटेमाळ येथे बाल दिन साजरा करण्यात आला. औद्योगिक वसाहतीच्या नजीकच असलेल्या झोपडपट्टीतील मुलांना खाऊ खेळणी आणि कपडे यांचे वाटप केले.
इनरव्हील क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी एक समाजसेवी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. लोटे येथील इनरव्हील क्लब हा सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवून कायम समाजसेवेत कार्यरत असतो. नुकताच १४ नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा करण्यात आला यावेळी लोटे येथील औद्योगिक वसाहती नजीक असलेल्या झोपडपट्टीतील मुलांना खाऊ खेळणी आणि कपड्यांचे वाटप या क्लबच्या वतीने करण्यात आले.
क्लबच्या अध्यक्षा सुष्मिता पाटील, सचिव प्रणाली रेडीज, सदस्य पुनम कळवणकर, सोनाली रहाटे उपस्थित होत्या. चिल्ड्रन्स डे च्या औचित्यावर या मुलांना खाऊ खेळणी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या क्लबच्या सदस्यांना समाधान देऊन गेला.









