फ़ास्ट रेल्वे समोर उडी घेत तरुणाने संपवले आयुष्य 

 

 

रत्नागिरीतील आरटीओ जवळील घटना

रत्नागिरी : प्रतिनिधी 

शहरानजिकच्या आरटीओ कार्यालया जवळील रेल्वे पुलावर तरुणाने फास्ट रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 3.45 ते 4 वा. कालावधीत घडली आहे.

वासू दौलत कडकपट्टी (22,रा. कुवारबाव, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या ठिकाणी तरुणाचे शीर धडावेगळे झालेले दिसून आले.मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.