दापोलीत मतदार संघात ९४.०८ टक्के गृह मतदान

 
खेड(प्रतिनिधी) दापोली विधानसभा क्षेत्रात गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ९४.०८ टक्के मतदान झाले असल्याचे उपविभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दिव्यांग व ८५पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना ही सुविधा उपलब्ध होती. दापोली विधानसभा क्षेत्रात ९३० मतदारांनी गृह मतदानाचा विकल्प निवडला होता. ९३० पैकी ११३ दिव्यांग व ८१७ मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार होते. त्यापैकी ११० दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वयाच्या ७६५ ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ मतदार मृत असून ३६ मतदार गृहभेटीदरम्यान विविध कारणांमुळे अनुपस्थितीत होते. २ मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला. गृहभेट मतदानासाठी ४२पथके तयार करण्यात आली होती.