
फटाक्याची आतशबजी, कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोषाल रॅली
आमदार नितेश राणे यांनी मोदी,फडणवीस, नारायण राणे साहेब यांचे दाखवले फलक
गुलाबाची केली उधळण
कणकवली : भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचंड मताधिक्याने झालेल्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आले भाजप कार्यालय ते नरडवे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौक मधून बाजारपेठेत झेंडा चौक, ढालकठी कडून पटकेदेवी कडे ही विजय मिरवणूक निघाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, त्याचप्रमाणे डीजे आणि डॉल्बीचा नादावर ही रॅली निघाली काढण्यात आली.
यावेळी आप्पासाहेब पटवर्धन चौकातील मुख्य चौकात दोन जेसीबी वरून फुलांचा फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे फलक उंचावत जनतेचे आणि सर्व नेत्यांच्या आभार मानले












