गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा 02 डिसेंबर पासून प्रारंभ

 

(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री सदगुरू दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट
सोमवार दि.02 डिसेंबर ते गुरूवार दि.19 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रचे हे 19 वे वर्ष आहे. पदयात्रा मार्गक्रमण पुढील प्रमाणे आहे.

पदयात्रा मार्ग – दुपारी विश्रांती – व रात्री निवास.
दि.02 डिसेंबर – गावखडी मठ प्रारंभ दु.4 वा. निवास – गोळप
दि.03 डिसेंबर- रत्नागिरी, हातखंबा
दि.04 डिसेंबर- नाणिज, करंजारी
दि.05 डिसेंबर- दाभोळे, साखरपा
दि.06 डिसेंबर – आंबा, मलकापुर
दि.07 डिसेंबर- बांबवडे, पैजारवाडी
दि.08 डिसेंबर- कोल्हापुर (पंचगंगा नदी काठ ),कोल्हापुर
दि.09 डिसेंबर- हातकणंगले, जयसिंगपुर
दि.10 डिसेंबर- मिरज, भोसेगाव
दि.11 डिसेंबर- कुची, शेळकेवाडी
दि12 डिसेंबर- जुनोनी, पाचेगाव
दि.13 डिसेंबर- सांगोला,
आंधळगाव
दि.14 डिसेंबर- गणेशवाडी, माचणुर
दि15 डिसेंबर- सोहाळे, थोरली कामती
दि.16 डिसेंबर- तीऱ्हे, सोलापुर
दि 17 डिसेंबर- कुंभारी, तोगराळी
दि.18 डिसेंबर- कोन्हाळी, कोन्हाळी
दि.19 डिसेंबर- अक्कलकोट
दि. 20 डिसेंबर- गावखडी सांयकाळी

दि.21 डिसेंबर 2024 श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगलस्नान, पुजन, महाआरती, महाप्रसाद ,या पदयात्रेमध्ये प्रवेश व सहभाग विनामूल्य आहे. तरी इच्छूक श्री स्वामीभक्तांनी पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी यांच्याकडून करण्यात आले आहे.