रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे जाळीत अडकलेल्या अवस्थेत सापडला होता अजगर
मौजे रत्नागिरी येथील मिऱ्या बंदर समुद्रकिनारी आजगर साप जाळीमध्ये अडकला असल्याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना माहिती मिळाली , त्यानंतर तत्काळ जागेवर जाऊन जाळीमध्ये अडकलेला अजगर हा श्री शहीद तांबोळी व वनरक्षक रत्नागिरी प्रभु साबणे यांनी जाळीतून सुटका केली, व अजगर ताब्यात घेतला, त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी डॉ श्री काळगे यांना दाखविले त्यांनी त्यावरती प्रथमोपचार केले, जखम मोठी असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी व विभागीय वनाधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुढील उपचारासाठी अजगराला पुणे येथील रेस्क्यू सेंटर या ठिकाणी पाठविणे बाबतीत सुचना मिळाल्याने आजगर दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे रेस्क्यू टीम यांच्या कडे उपचार करण्यासाठी पाठविण्यात आला , सदर सापावर तब्बल तीन महिने उपचार करून साप व्यवस्थित रित्या तंदुरुस्त झाल्यानंतर , पुणे रेस्क्यू टीमने रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना माहिती दिली , व अजगर साप हा दिनांक 12/ 12/ 2024 रोजी रत्नागिरी कार्यक्षेत्रामधील पाण्याच्या ठिकाणी अजगास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले , यावेळी रत्नागिरी परिक्षेत्राचे वनअधिकारी प्रकाश सुतार, रत्नागिरी वनपाल गावडे , वनरक्षक प्रभू साबणे, वनमजुर हरी गुरव, वन्यप्राणी मित्र शाहीद तांबोळी, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, आधी उपस्थित होते. तरी आपल्या परिसरात कुठलाही वन्यप्राणी, पशुपक्षी अडचणीत सापडला असेल तर वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी वन विभागाच्या वतीने माननीय विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरजा देसाई मॅडम यांनी केले आहे












