खेड (प्रतिनिधी) – खेड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सन्मा. श्री. रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी श्री. संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि 28 एप्रिल रोजी जनता दरबार उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या विविध शासकीय, प्रशासकीय तसेच स्थानिक प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली. नागरिकांच्या अडचणी थेट राज्य शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले.
यापुढेही अशा प्रकारचे जनता दरबार नियमितपणे आयोजित करून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, तसेच जनसेवेचा प्रवास अधिक जबाबदारीने सुरू ठेवला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा सोशल प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता यांच्यासह खेड तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












